Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचे प्रवेशद्वार बंद, दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कवंडे येथे तब्बल एक हजार जवानांनी अवघ्या २४ तासात उभारले पोलीस मदत केंद्र..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकसपर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली :- जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कवंडे येथे तब्बल एक हजार जवानांनी अवघ्या २४ तासात पोलीस मदत केंद्र उभारल्याने नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.कवंडे हे गाव छत्तीसगड सीमेपासून केवळ दोनशे मीटर अंतरावर असल्याने नक्षलवादी येथून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करायचे. परंतु हे पोलीस मदत केंद्र उभारल्यामुळे नक्षलवाद्यांची कोंडी आहे.

नक्षलवादी येथून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करायचे. जिल्ह्यातील सीमा वरती भागात

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नक्षलविरोधी मोहीम तीव्र करून जवान डोळ्यात तेल टाकून पाहत आहेत. छत्तीसगडसह गडचिरोली जिल्ह्यातही नक्षलवादावर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश मिळनार आहे. मागील तीन वर्षात गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगड अबुझमाड सीमेवर सात पोलीस मदत केंद्राची स्थापना केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यातील भामरागड तालुक्यात येत असलेल्या नेलगुंडा, पेनगुंडा आणि कवंडे ही गावे नक्षलवाद्यांचे नंदवन म्हणून ओळखल्या जायचे. मात्र, गेल्या तीन महिन्यात या तीनही गावात गडचिरोली पोलिसांनी रस्ते, मोबाईल नेटवर्कसह पोलीस मदत केंद्र उभारून नक्षलवादाचे कंबरडे मोडले आहे.

गडचिरोली सीमेवर शेवटच्या छत्तीसगड राज्याच्या टोकावर असलेले कवंडे येथून जवळ असलेल्या इंद्रावती नदीपासून छत्तीसगड येथील बिजापूर जिल्ह्याची सीमा आहे. हा परिसर नक्षलवादी कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे.

कवंडे येथे नवीन पोलीस मदत केंद्र उभारल्याने नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.सीमा भागातील गुन्हेगारी वाढत असल्याने या नवीन पोलीस स्टेशनची गरज भासली. या भागातील गुन्हेगारी विरोधात प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलिसांना अधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने ही स्थापना करण्यात आली आहे. या पोलीस स्टेशनमध्ये आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारी विरोधात कारवाई करण्याचा गडचिरोली पोलिसांचा प्रयत्न आहे. अलीकडेच भामरागड तालुक्यात पेनगुंडा, नेलगुंडा त्यानंतर आता कवंडे येथे नवीन पोलिस स्टेशनची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील दोन वर्षात एकूण ७ पोलिस स्टेशनची स्थापना करण्यात आली आहे. कवंडे येथील पोलिस स्टेशन उभारण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा उभा करण्यात आला होता. तसेच येथे जनजागरण मेळावा घेऊन परिसरातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.छत्तीसगड सीमेवरील नवीन पोलीस स्टेशनची स्थापना ही केवळ सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीनेच नाही तर ती स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील चांगला फायदा पोहोचवणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल अशी आशा आहे.यावेळी घेतलेल्या जनजागरण मेळाव्यात गावाकऱ्यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह गावकरी व जवान उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.