Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीसांनी अवैध दारुसह एकुण 9,26,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली:- जिल्ह्रात दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे पोलीस पथक यांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मौजा कुनघाडा रै, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथील रहिवासी नामे गोलु मंडल हा त्याच्या साथीदारासह एका लाल रंगाच्या एक्स यु व्ही 500 या चारचाकी वाहनात चामोर्शी ते घोट कृष्ण नगर मार्गे देशी-विदेशी दारुची वाहतूक करणार आहे. अशा मिळालेल्या माहितीवरुन सदर मार्गावर पोस्टे चामोर्शी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी संयुक्तपणे नाकाबंदी करुन सापळा रचला होता. यादरम्यान पोलीस पथकांना वरील वर्णनाप्रमाणे असलेले संशयीत चारचाकी वाहन भरधाव वेगाने येताना दिसल्यावर पोलीसांनी सदर वाहनाला थांबण्याचा इशारा केला. मात्र वाहन जंगलाच्या दिशेने वळवून आरोपी वाहन जंगलात सोडून पळून गेले.

यानंतर पोलीसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात 1) 180 मिली मापाचे टोयोटा कंपनीच्या एकुण 15 बॉक्स, किंमत 2,16,000/ रुपये, 2) 90 एम एल मापाचे देशी दारूचे एकुण 30 बॉक्स, किंमत 2,10,000/रुपये व 3) एक एक्स यु वी 500 महिंद्रा कंपनीचे चार चाकी वाहन क्रमांक एम एच 49 ए 5925 किंमत अंदाजे 5,00,000/ रुपये असा एकुण 9,26,000/- (अक्षरी नऊ लाख सव्वीस हजार रुपये) रुपयांचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त केला आहे. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे चामोर्शी येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम 65 (अ), 98 (2), 83 महा. दा. का. अन्वये आरोपी नामे 1) गोलु मंडल रा. कुनघाडा रै, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली व 2) अज्ञात वाहन चालक यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर आरोपी हे गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे असून याअगोदरही त्यांच्यावर विविध पोस्टे येथे गुन्हे दाखल आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, पोस्टे चामोर्शीचे पोनि. अमुल कादबाने, स्थानिक गुन्हे शाखेचे भगतसिंग दुलत, चामोर्शी व स्थागुशाचे पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.