Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पं. स.आरमोरी मधील शिक्षकांचे प्रश्न त्वरित निकाली काढा- जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी:-जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी संवर्ग विकास अधिकारी आरमोरी यांच्या दालनात खास शिक्षकांसाठी तसेच सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या संदर्भात आज पंधरा मिनिटांची सभा लावली. आणि त्यामध्ये शिक्षकांचे प्रलंबित पक्ष प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात यावे . असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी संवर्ग विकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी सहाय्यक लेखाधिकारी व संबंधित लिपिक यांना दिला.

यावेळी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रतिनिधी योगेश ढोरे ,आरमोरी चे अध्यक्ष जीवन शिवणकर, रविंद्रजी सोमनकर तालुका सरचिटणीस प्रदीप बोरकर , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर गडपायले, कार्याध्यक्ष दीपक घोडमारे ,तसेच सेवानिवृत्त संघटनेचे वसंत राऊत ,प्रामुख्याने उपस्थित होते . शिष्टमंडळाने अध्यक्ष महोदया सोबत सकारात्मक चर्चा केली. यथाशिग्र प्रश्न निकाली न निघाल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल ,असं अध्यक्ष महोदय यांनी शिक्षण विभाग व लेखा विभागास सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी जिल्हा परिषद उपाद्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, जिल्हा परिषद सदस्य संपत आडे, आरमोरी पंचायत समितीचे सभापती नीता ढोरे ,जिल्हा परिषदेच्या सदस्य मनीषा दोनाडकर, मितलेश्वरी खोब्रागडे, वनिता सहकाटे ,पंचायत समितीचे उपसभापती विनोद बावनकार, सदस्य विवेक खेवले, अशी पदाधिकारी उपस्थित होते

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.