Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आ. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय पोलिसांच्या रडारवर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

जळगाव : बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या दोन कट्टर समर्थकांना अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आलेली असून, यात जळगाव व जामनेरसह इतर ठिकाणच्या प्रतिष्ठित लोकांचा समावेश असल्याने वातावरण तणावपूर्ण झालेले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अटक केलेल्यांमध्ये जामनेर येथील जितेंद्र रमेश पाटील, छगन झालटे आणि राजेश लोढा यांचा समावेश आहे. जितेंद्र रमेश पाटील व छगन झालटे हे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. यातील जितेंद्र पाटील यांच्या घरून जामनेरातील राजकीय सूत्रे हलत असल्याचे आधीच दिसून आलेले आहे. महाजन यांचे अनेक महत्वाचे व्यवहार देखील ते सांभाळत असल्याची चर्चा आधी देखील होत होती.

या अनुषंगाने आज त्यांना झालेली अटक ही लक्षणीय मानली जात आहे. तर छगन झालटे हे देखील आमदार महाजन यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून मानले जातात.
महत्वपूर्ण म्हणजे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांना देखील धक्का बसलेला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

घोटाळ्यात अटक करण्यात आलेले भागवत भंगाळे हे भोळे यांचे जवळचे आहेत. ते जळगावातील प्रतिथयश व्यावसायीक आहेत. यामुळे त्यांना झालेली अटक वातावरण तापवणारी ठरली आहे. भुसावळातून अटक करण्यात आलेले आसीफ तेली हे देखील भाजप नेत्याचे पुत्र आहेत. यामुळे या प्रकरणातील तर्कवितर्क व राजकीय आयाम हे धक्कादायक ठरतील असे मानले जात आहे.

हे देखील वाचा  :

कर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार

सेना भवनसमोर राडा, शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले

 

Comments are closed.