Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागात जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली 23 फेब्रुवारी :- गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक सामाजिक न्याय दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक न्याय बद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी व्याख्यानाचा कार्यक्रम नूकतेच आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रा. डॉ. सुनील बागडे व डॉ. अनिरुद्ध गचके यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. गचके यांनी सामाजिक न्याय एक व्यापक संज्ञा असून तिला खरोखरच प्रत्यक्षात उतरवायचे असेल तर सर्वांना आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्य यांची माहिती असणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

डॉ. सुनील बागडे यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी दुर्बल घटकांचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे सांगत भारताप्रमाणे जगातही कशाप्रकारे सामाजिक न्याय या संकल्पनेला अमलात आणण्याचे प्रयत्न केले गेले आणि कसे सकारात्मक परिणाम पहायला मिळाले. यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद जावरे यांनी तर आभार प्रदर्शन सह समन्वयक डॉ. वैभव मसराम यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.