Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दीड वर्षापूर्वी चोरलेले २० लाखांचे सोने जप्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

नागपूर, दि. १७ नोव्हेंबर: दीड वर्षापूर्वी शहरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापकाकडे घरफोडी करून चोरलेले २१ लाखांचे सोने बजाजनगर पोलिसांनी जप्त केले आहे. या घरफोडीतील ३९५ ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले आहेत. हा चोर पकडले जाण्याच्या भीतीने नागपूरऐवजी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरमध्ये ट्रकचालकाची नोकरी करीत होता.

पोलिसांनी अमोल महादेव राऊत (३२), रा. बुटीबोरी याला अटक केली. त्याच्याकडून ३५ हजार रूपये जप्त केले होते. त्याने तपासात चोरीचे सोने श्रीकांत जीवन निखाडे (२९), रा. तितूर, कुही याचे नाव सांगितले. पोलिसांनी श्रीकांतला आरोपी केले आणि त्याचा शोध सुरू केला. मात्र तो पोलिसांना वारंवार गुंगार देत होता. त्यामुळे त्यास फरार घोषित करण्यात आले होते. गेल्या दीड वर्षांंपासून आरोपी पोलिसांना चकमा देत असल्यामुळे डीसीपी नुरूल हसन यांनी बजाजनगरचे ठाणेदार महेश चव्हाण यांना आरोपीला अटक करण्याचे निर्देश दिले. त्यावरून बजानगरचे डीबीचे गोवींदा बारापात्रे, गौतम रामटेके, अमित गिरडकर आणि सुरेश वरूडकर यांनी आरोपीला अटक करण्यासाठी सापळा रचला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरोपी श्रीकांत निखाडे याने अटक होण्याच्या भीतीने नागपूर सोडले आणि भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे ट्रक ड्रायव्हर म्हणून नोकरी करायला लागला. त्याने नाव बदलले आणि मोबाईल वापरणे बंद केले. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. शेवटी ठाणेदार चव्हाण यांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून श्रीकांतला अटक केली.

फिर्यादी योगेश शेंडे (३७) रा. रेल्वे कॉलनी. प्रतापनगर खाजगी काम करतात. तर त्यांचे वडील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. ते ५ ऑगस्ट २०१९ रोजी कुटुंबासह बाहेरगावी राहणाऱ्यां नातेवाईकाकडे चौदावीच्या कार्यक्रमाला गेले होते. दरम्यान त्यांच्या घरी चोरी झाली. चोरट्यांनी ४५५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३५ हजार रूपये रोख लंपास केले होते.  प्रा. शेंडे यांच्या घरातून जवळपास अर्धा किलो सोने चोरल्यानंतर मुख्य आरोपी अमोल राऊतने सोने श्रीकांतला दिले होते. श्रीकांतने ते सोने प्रकाश मारोतराव पंचभाई (४५) रा. शेगावनगर, बहादूरा याला दिले. प्रकाशने सराफा व्यापारी दुर्गेश केशवराव सुरपाटणे (४६) रा., बेसा याला विकले. ‘वडीलाला कँसर असल्यामुळे सोने विकायचे आहे, अशी थाप त्याने सराफाला दिली होती. सराफाने ३९५ ग्रॅम सोने विकत घेत त्याला २० लाख ५४ हजार रूपये दिले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा



Comments are closed.