Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यस्तरीय ‘आव्हान’ शिबिरात गोंडवाना विद्यापीठाला उत्कृष्ट दिंडीसाठी द्वितीय क्रमांकाचे पारीतोषीक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 03 , जानेवारी :- राजभवन कार्यालयाकडून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे राज्यस्तरीय दहा दिवसीयआपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर ‘आव्हान’ आयोजित करण्यात आले होते. यात उत्कृष्ट शोभायात्रेसाठी गोंडवाना विद्यापीठाला राज्यातुन द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

धार्मिक सलोखा, एकात्मता, भारतीय संविधान, वारकरी संप्रदाय, विज्ञान तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती, पर्यावरण, मतदान जागृती अशा अनेक विषयांची हाताळणी करणारे देखावे , नृत्य, पोस्टर्स यांचे सादरीकरण शोभायात्रा मध्ये करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही थीम शोभायात्रेसाठी देण्यात आली होती. विविध विषयांवरील फलक आणि सजीव देखावे या वेळेला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. या शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी सादर केलेले रेला नृत्य तसेच डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आणि देवाजी तोफा यांच्या वेषभूषा सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. उत्कृष्ट प्रदर्शन करत उत्कृष्ट दिंडीचा द्वितीय क्रमांक गोंडवाना विद्यापीठाच्या स्वयंसेवकांनी पटकावला.
आव्हान शिबिरात गोंडवाना विद्यापीठाचे ३०विद्यार्थी आणि २०विद्यार्थीनी असे एकुण ५० रासेयो स्वयंसेवक सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील २० विद्यापीठांमधील१०४८जण सहभागी झाले होते यामध्ये५७० विद्यार्थी तर ४१८ विद्यार्थिनी ३९ पुरुष संघ व्यवस्थापक , २१ महिला संघ व्यवस्थापक यांचा समावेश होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गोडवाना विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमधिकारी डॉ. प्रमोद जावरे, डॉ.सविता गोविंदवार, शरद पवार महाविद्यालय गडचांदुरचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शरद बेलोरकर, सरदार पटेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.उषा खंडाळे संघनायक म्हणून सहभागी झाले होते. गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजने चे संचालक डॉ. श्याम खंडारे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी शोभायात्रेत तसेच संपूर्ण ‘आव्हान’शिबिरात उत्कृष्ट प्रदर्शन केले. गोडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी सहभागी सर्व राष्ट्रीय स्वयंसेवकांचे तसेच कार्यक्रम अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.