Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अनुसूचित जातीतील युवा-युवतींच्या स्वप्नांना गोंडवाना विद्यापीठाचे बळ

बार्टी आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,

गडचिरोली, 26 सप्टेंबर : गोंडवाना विद्यापीठातील सलंग्नित महाविद्यालयातील अनुसूचित जातीतील युवक-युवती स्वतःच्या पायावर उभे राहून ते स्वावलंबी व्हावेत, त्यांना कौशल्याचे बळ प्राप्त व्हावे, यासाठी बार्टीचे मोफत स्वरुपात स्पर्धा परीक्षेचे अनिवासी प्रशिक्षण वर्ग लवकरच कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात येणार आहे.

आज घडीला पुण्यासारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्याचा विचार करायचा झाल्यास राहण्याची व्यवस्था, खानावळ, अभ्यासिका, पुस्तकं, क्लासेस यासारख्या गोष्टीसाठी खूप पैसे लागतात. यामध्ये क्लासेसची फीही भरपूर असते.याचबरोबर महिन्याला होणाऱ्या खर्चाचं प्रमाण जास्त आहे. जे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न परवडणारं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विद्यापीठातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण राबविण्याकरिता महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) यांच्याकडे प्रशिक्षणाकरिता येणारा खर्च तसेच इतर तत्समबाबींचा प्रस्ताव विद्यापीठाने सादर केलेला होता. सदर प्रस्तावास मान्यता प्राप्त झाली असून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि बार्टी यांच्यात सामंजस्य करार नुकताच झाला आहे .

त्यानुसार प्रत्यक्षात अनुसूचित घटकातील युवा-युवतींसाठी स्पर्धा परीक्षेचे मोफत अनिवासी
प्रशिक्षण वर्ग गोंडवाना विद्यापीठात सुरू होणार आहे. याकरिता अनुसूचित जातीमधील युवक-युवतींसाठी अनिवासी निःशुल्क स्पर्धा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमांकरिता विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येणार आहेत. बार्टीचे केंद्र गोंडवाना विद्यापीठात सुरू व्हावे यासाठी कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी विशेष प्रयत्न केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे प्रशिक्षण पूर्णतः निःशुल्क असून, प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च बार्टी पुणे मार्फत केला जाणार आहे. गोंडवाना विद्यापीठात अनिवासी प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे. इच्छूक प्रशिक्षणार्थीच्या प्राप्त अर्जामधून निकषांच्या आधारे अर्जांची छाननी करून निवडक उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे.या मध्ये विद्यार्थ्यांना ६०००रुपयांचे शिष्यवृत्ती मिळेल या संदर्भात नुकतीच एक सभा घेण्यात आली असून लवकरच प्रशिक्षण वर्ग प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती या केंद्राचे समन्वयक सा. प्रा. डॉ. संतोष सुरडकर यांनी दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.