Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाचा ऐतिहासिक टप्पा! लॉईड्स मेटल्स व ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठासोबत सामंजस्य करार.

राज्यपाल, मुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

ओमप्रकाश चुनारकर, मुंबई : गडचिरोली जिल्ह्यासाठी शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील सुवर्णद्वार खुले करणारा ऐतिहासिक क्षण आज राजभवनात अनुभवायला मिळाला. गोंडवाना विद्यापीठ, लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी आणि ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ यांच्यात सामंजस्य कराराचे आदानप्रदान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

या सोहळ्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार परिणय फुके, ऑस्ट्रेलियाचे वाणिज्यदूत पॉल मर्फी, कर्टीन विद्यापीठाचे प्रकुलगुरु मार्क ऑग्डन, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, लॉईड्स मेटल्सचे एमडी बी. प्रभाकरन यांच्यासह राज्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोलीत प्रगत अभियांत्रिकी शिक्षणाची नवी दिशा.

या करारांतर्गत गोंडवाना विद्यापीठ व लॉईड्स मेटल्स यांच्यामध्ये गडचिरोली येथे ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’ स्थापन केली जाणार असून, स्थानिक युवकांना धातुशास्त्र, खाणकाम, संगणक विज्ञान आणि विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या माध्यमातून आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्याच्या युवकांसाठी उच्च शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होतील.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी जुळे पदवी अभ्यासक्रम.

दुसऱ्या करारानुसार, गोंडवाना विद्यापीठ आणि कर्टीन विद्यापीठ (पश्चिम ऑस्ट्रेलिया) यांच्यात जुळे पदवी अभ्यासक्रम (ट्विनिंग डिग्री प्रोग्राम) राबवले जाणार आहेत. यामुळे गडचिरोलीतील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेऊ शकतील. शिक्षणाचा दर्जा आणि संधी यामध्ये एक ऐतिहासिक उडी घेतली गेली आहे, असे यावेळी वक्त्यांनी सांगितले.

गोंडवाना विद्यापीठाच्या प्रगतीचा टप्पा” — फडणवीस

“हा करार म्हणजे केवळ कागदोपत्री औपचारिकता नाही, तर गोंडवाना विद्यापीठाच्या आत्मविश्वासाचा आणि नव्या उंचीचा प्रतिक आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. राज्यपाल राधाकृष्णन यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करत, “गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात शिक्षणाचा प्रकाश पोहोचवण्याचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत,” असे मत व्यक्त केले.

Comments are closed.