Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खुशखबर…राज्यात १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार मोफत लस

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २५ एप्रिल:  राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण मोफत होणार असल्याची घोषणा नवाब मलिक यांनी केली आहे.

दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने लशीचे दर जाहीर केले आहेत. १ मेपासून देशामध्ये १८ वर्षांवरील सर्वांना कोव्हिड-१९ साठीची लस घेता येणार आहे. त्यासाठी १ मे पूर्वी लशीचे दर जाहीर करावेत, असे सरकारने लस उत्पादक कंपन्यांना सांगितले होते. त्यानुसार सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने त्यांच्या ‘कोव्हिशील्ड’ लशीचे दर जाहीर केले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मलिक म्हणाले,”केंद्र सरकारने १ मेपासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे वय वर्ष ४५ खालील लोकांना केंद्र लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. कोविडशिल्ड लस केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगी रुग्णालयांना ६०० रुपयाला मिळणार आहे. कोवॅक्सिनची किंमत सुद्धा राज्यांना ६०० रुपये व खाजगी विक्रीसाठी १२०० रुपये अशी जाहीर करण्यात आली आहे,” असे नवाब मलिक म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

टेंडर काढण्यात येणार

महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील प्रत्येकाचं मोफत लसीकरण करण्यात येईल. सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल. जागतिक टेंडर मागवण्यात येणार असून, जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे. मागच्या कॅबिनेट बैठकीत या दराबाबत चर्चा झाली. यावर एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच जाहीर केले आहे. मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार आहे, अशी माहितीही नवाब मलिक यांनी यावेळी दिली.

अशी करा नोंदणी

https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा फोननंबर रजिस्टर करू शकता. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तींना लस घ्यायची आहे, त्यांचा तपशील भरून त्यांचं नाव नोंदवता येईल. यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रांमधले उपलब्ध स्लॉट्स तपासून तुमच्यासाठी एक वेळ बुक करू शकता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.