Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवकाळी पावसात विज पडून आजी नातीचा मृत्यु

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

लातुर :  जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील पिरूपटेल वाडी या गावातील एक महिला व तिची नात वीज पडून ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

निलंगा तालुक्यातील पिरूपटेल वाडीतील ५९ वर्षीय ललीता नारायण ईरलापल्ले व १५ वर्षीय नात पायल सतिष ईरलापल्ले या स्वत:च्या शेतातील झाडाखाली थांबले असता अचानक त्यांच्या अंगावर वीज पडल्याने दोघी आजी नात जागीच ठार झाल्या आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेची माहिती गावचे सरपंच नसरुद्दीन पटेल यांनी तात्काळ तलाठी व पोलीस स्टेशनला माहिती देऊन पंचनामा करून वीज पडून मरण पावलेल्या कुटुंबाला मदत करावी. अशी मागणी केली आहे. तलाठी निळकंठ ननवरे हयांनी घडलेल्या घटनेचा अहवाल तयार केला असून कासार शिरसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून कासारबालकुंदा तांबाळा मदनसुरी हालशी हत्तरगा हासुरी या भागात मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या महिनाभरापासून १८ जणावरे विज पडून दगावली आहेत त्यांनाही मदत लवकर द्यावी.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अचानक झालेल्या आवकाळी पावसात तालुक्यातील हालसी हत्तरगा येथील व्यंकट रामराव इंगळे यांची म्हैस अंगावर विज पडून ठार झाली असून अंदाजे ७० हजार रूपयांचे सदरील शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

हे देखील वाचा :

लॉकडाऊन वाढणार की हटवणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साधणार संवाद

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेशासाठी कुटूंबाची उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये करण्याचा निर्णय

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.