निसर्गाशी नाते घट्ट करणारे ‘ग्रीन्स किलबिल’ शिबिर यशस्वी; विद्यार्थ्यांत उमटली सृजनशीलतेची झलक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: “खेळू, नाचू, गाऊया… मामाच्या गावाला जाऊया…” या बालसुलभ कल्पनेवर आधारित आणि निसर्गप्रेम जागवणाऱ्या ग्रीन्स किलबिल नेचर क्लबच्या विशेष शिबिराचे आयोजन गोंडवाना सैनिक विद्यालय, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे उत्साहात पार पडले. हे शिबिर वद्ये कंपनीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. सलग पाचव्या वर्षी हे शिबिर अधिक रंगतदार ठरले.
या उपक्रमाचे आयोजन मा. आ. डॉ. राजे. धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. विशेष आकर्षण ठरली गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या मा. तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांची उपस्थिती. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विज्ञान, प्रयोग, पर्यावरण आणि नवचैतन्यपूर्ण शिक्षणाच्या दिशा दाखविल्या.
या वेळी अंजली कुलमेथे, वन्यजीव मानत सदस्य मिलिंद उमरे, पत्रकार शेमदेव चाफळे, सुभाष धंदरे सर आणि सुधीर गोहने यांची उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांत मार्गदर्शन करत सहभागास प्रोत्साहन दिले.
या शिबिरात खेळ, गाणी, नृत्य, चित्रकला, विज्ञान प्रयोग, पर्यावरण जागृती आणि संवाद यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत उत्स्फूर्त होता. निसर्गाशी नाते जपणारी पिढी घडवण्यासाठी अशा शिबिरांची गरज अधोरेखित झाली.
Comments are closed.