Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भिमाकोरेगाव विजय स्तंभाला घरातुनच अभिवादन करा – राहुल डंबाळे

Get real time updates directly on you device, subscribe now.

१ जानेवारी भिमाकोरेगाव विजयस्तंभ अभिवादनाचा शौर्य दिन सोहळा कोविड-१९ च्या  पार्श्वभूमीवर साधेपणाने  साजरा करण्याचे अवाहन भिमाकोरेगाव विजय शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने अध्यक्ष राहुल डंबाळे यानी राज्यातील व देशभरातील आबेडकरी अनुयायांना केले आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क, दि. १५ डिसेंबर – जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोणत्याही, सभांना, जाहिर कार्यक्रमांना तसेच स्टॉलसाठी कोणतीही परवानगी देण्यात येत नसल्याचे समजले असून  दरवर्षी अत्यंत उत्सवाने, प्रचंड गर्दीने साजरा होणारा १ जानेवारी भिमाकोरेगाव विजयस्तंभ अभिवादनाचा शौर्य दिन सोहळा कोविड-१९ च्या  पार्श्वभूमीवर साधेपणाने  साजरा करण्याचे अवाहन भिमाकोरेगाव विजय शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने अध्यक्ष राहुल डंबाळे यानी राज्यातील व देशभरातील आबेडकरी अनुयायांना केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोनाचा देशामधील प्रादुर्भाव पुणे परिसरात असून आज रोजी पुणे परिसरात तब्बल १४ हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत तसेय वैदयकिय क्षेत्रातील तज्ञांनी डिसेंबर व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका वर्तविला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिसरातील सर्व प्रकारचे गर्दीने साजरे होणारे धार्मिक व सामाजिक कार्यक्रम ज्यामध्ये जेजुरी, आळदी व इतर ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. भिम अनुयायांनी भिमजयंत्ती, धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूर व महापरिर्वाणदिन चैत्यभूमी  प्रमाणे आंबेडकरी  अनुयायांनी भिमाकोरेगाव लढ्यातील शुरविराना अभिवादन करुन भिमाकोरेगाव येथे येण्याये टाळावे असे अवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

समितीच्या व आयोजक कार्यकर्ने पक्ष संघटना यांच्या समवेत पुणे जिला महसूल व पोलीस प्रशासनाने १० ऑक्टोबर व डिसेंबर रोजी दोनदा बैठका घेतल्या असून यावेळी जवळपास सर्वानुमते यंदाया उत्सव हा केवळ अत्यंत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरूपामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तसेच यंदाच्या वर्षी १ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोणत्याही सभाना, जाहिर कार्यकमाना तसेच स्टॉलसाठी कोणतीही परवानगी देण्यात येत नसल्याचे सुतोवाच करण्यात आलेले

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आहे. तसेच प्रमुख राजकिय पक्ष व सामाजिक संघटना यांनी देखील यावेळी नागरिकांनी याठिकाणी येण्याचे टाळून आपली काळजी घेण्याचे अवाहन केले आहे.

दरम्यान समितीच्या वतीने तसेच स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वतत्ररित्या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विविध समाज माध्यमे व ऑनलाईन पोर्टल मार्फत तसेच दुरदर्शन व इतर वाहीन्यांच्याद्वारे करण्यात येणार आहे. व यासाठी नागरिकांना वेळोवेळी माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी यंदाच्या वर्षी देखील 7820966966 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

दरम्यान समस्त आबेडकरी समुदायाने माझा समाज माझी जवाबदारी या अन्वये भिमजयती, धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूर व महापरिवर्वाणदिन चैत्यभूमी अभिवादनाप्रामणेच भिमाकोरेगावचे देखील अभिवादन घरच्या घरी करून एक आदर्श निर्माण करावा अशी अपेक्षा समितीच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. अशी माहिती डंबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.