Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महात्मा फुले जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन”

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी  अविश्यांत पंडा यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला.

यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या कार्याला व विचारांना अभिवादन केले. शिक्षण, सामाजिक समता आणि शोषणमुक्त समाजाची उभारणी या त्यांच्या विचारांची आजही तितकीच गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांद्वारे तळागाळातील घटकांपर्यंत विकास पोहोचविण्याचा प्रयत्न होत असून, तो महात्मा फुले यांच्या विचारांचीच अंमलबजावणी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करून समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.