Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी डॉक्टर पत्नीचा छळ, अवैध प्रॅक्टिससाठीपण दबाव घटस्फोट न घेता दुसरा विवाह

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क 

गडचिरोली, 17 मे – वर-वधू दोघेही एमबीबीएस डॉक्टर असल्याने मुलीच्या पुढील शिक्षणासाठी दहा लाख रुपये वधुपित्याकडून वरपक्षाने उकळले. त्यानंतरही दवाखाना थाटण्यासाठी माहेरहून २५ ते ३० लाख लाटले तसेच नोंदणीकृत नसलेल्या दवाखान्यात अवैध प्रॅक्टिस कर म्हणून डॉक्टर पती व सासरच्यांनी दबाव आणल्याची तक्रार डॉक्टर पत्नीने केली आहे. यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाण्यात व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. डॉ अमोल केशव पेशट्टीवार (वय ३२) रा. जोशी वार्ड अहेरी असे पत्नीला हुंड्यासाठी त्रस्त करणार्‍या पतीचे नाव आहे, त्यांना एक ५ वर्षांची मुलगी आहे. बाजारवाडी अहेरी येथे त्याचा दवाखाना आहे. या दवाखान्याचे शासनाकडे रजिस्ट्रेशन झाले नाही तरीही हा दवाखाना अवैधपणे चालविल्या जात असून या दवाखान्यात उपचार करण्यासाठी दबाव टाकल्या जात असल्याची तक्रार त्याच्या डॉक्टर पत्नीने केली आहे.

या तक्रारीवरून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलिसांनी डॉक्टर पती अमोल केशव पेशट्टीवार व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत.तर पहिल्या पत्नीशी घटस्फोट न होता देखील दुसरीशी विवाह केल्याची तक्रार दाखल झाल्याने अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

डॉ . अमोल पेशट्टीवार मूळचा पेठ वार्ड ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून २०१५ साली त्याचा विवाह यवतमाळच्या डॉक्टर कन्येशी झाला. लग्नावेळी पेशट्टीवार कुटुंबीयांनी सुनेच्या डिजिओ पदवी शिक्षणासाठी १० लाख रुपयांची मागणी केल्याने वधुपित्याने डॉ . अमोल च्या बँक खात्यात सदर रक्कम वळती केली. लग्नानंतर डॉ पत्नीने डिजिओ पदवी प्राप्त केली आणि हे डॉक्टर दाम्पत्य २०१७ ला अहेरी जि. गडचिरोली येथे स्थायिक झाले. आपल्या पदवी शिक्षणासाठी दहा लाख रुपये खर्च आला नाही त्यामुळे वडिलांना पैसे परत द्या अशी मागणी पत्नीने केली परंतु डॉक्टर पती पैसे परत देण्यास तयार झाला नाही, त्यामुळे दोघात वाद होऊन भांडणं झाली. पती पत्नीला या कारणावरून शिवीगाळ करू लागला. या कालावधीत अहेरीत डॉ अमोल पेशट्टीवार याने दवाखाना उभारला. या दवाखान्याचे रजिस्ट्रेशन करावे असे डॉक्टर पत्नीने सुचविले.

मात्र रजिस्ट्रेशन नसलेल्या दवाखान्यात रुग्णांवर अवैध उपचार करण्यास पती डॉ अमोल पेशट्टीवार याने भाग पाडले त्यामुळेही डॉक्टर दाम्पत्यात वाद झाले, एव्हढेच नव्हे तर पेशट्टीवार कुटुंबीय डॉ सुनेला पागल संबोधून हिणवितात व मानसिक त्रास देतात. डॉ स्नेहल यांचे गडचिरोली अर्बन बँकेत असलेल्या जॉईंट खात्यातून एफडी चे चार लाख रुपये बनावट स्वाक्षरी करून पतीने काढून घेतले. अहेरीला स्थायिक झाल्यानंतर घरी येणारे सासरे केशव पेशट्टीवार हे वेळोवेळी माहेरहून पैसे आणण्याच्या मागणीवरून शिवीगाळ करायचे त्याबाबत तक्रारीवरून अहेरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद आहे. हा राग मनात ठेऊन पतीने आपल्या डॉक्टर पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली, तर सासर्‍याने मद्यपी गुंडांना आणून धमकाविले, घराचे कुलूप कापून रोख रक्कम चोरून नेली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पती, सासरे, सासू, दीर व जाऊ वारंवार हुंड्यासाठी छळतात, मारहाण करतात, अपमानास्पद मानसिक त्रास देतात त्यामुळे जीवित्वास धोका असल्याची तक्रार डॉक्टर पत्नीने पोलिसांत दाखल केल्यानंतर अवधुतवाडी यवतमाळ पोलीस ठाण्यात आरोपी पती डॉ अमोल पेशट्टीवार, सासरे केशव पेशट्टीवार, सासू कुसुम, दीर विशाल आणि जाऊ चैताली, प्रेयशी समायरा पठाण, मावणभाऊ निखिल बेलवार यांच्याविरुद्ध भादंवि चे कलम ४९८ अ, ४०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा नोंदविला आहे.

हे पण वाचा – 

ट्रॅक्टर आणि बोलेरो गाडीच्या भीषण अपघातात 5 जण ठार, 3 जण जखमी

महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी कर्मचारी यांचे प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर करू- विकास गुप्ता व्यवस्थापकीय संचालक एफडीसीएम नागपूर

 

Comments are closed.