Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना रुग्ण वाढतायेत! लॉकडाऊन टाळायचे असल्यास नियम पाळावेच लागतील : आरोग्यमंत्री

राज्यातील काही भागात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

औरंगाबाद 15 फेब्रुवारी :- राज्यात दररोज 500 ते 600 ने कोविड रुग्णसंख्या वाढत आहे, अशी कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. काही ठराविक ठिकाणी रुग्ण वाढतायेत, खासकरून विदर्भ, मुंबईत रुग्ण वाढताय, त्यामुळं नियम पाळावे लागतील, ट्रॅकिंग करणे, ट्रेसिंग करणे आणि ट्रीटमेंट करने पाळावे लागेल. केंद्रीय कमिटीच्या सूचना आम्ही पाळतोय, टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे अशा सूचना केल्या आहेत, त्याचीही अंमलबजावणी सुरू केली असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अर्थसंकल्पात आम्हाला 4500 कोटी रुपये हॉस्पिटल बांधकामसाठी लागणार आहे, त्याची मागणी आम्ही केलीय, एशियन बँक राज्य सरकारला कर्ज देणार आहे, त्यातून आरोग्य विभागालाही मदत होईल. नियमानुसार आरोग्यावर जीडीपीच्या 5 टक्के खर्च व्हायला हवा, तो आतापर्यंत 1 टक्के होता त्यामुळं परिस्थिती पाहता आम्हाला भरीव निधी मिळेल ही अपेक्षा आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

जे अधिकारी ट्रॅकिंग, टेस्टिंगमध्ये लक्ष देत नाहीय, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. सध्या नियम पाळले जात नाहीये हे स्पष्ट दिसतंय. जनतेला त्रास होऊ नये म्हणून आपण निर्बंध उठवले. मात्र, नियम पाळावे लागतील, जर नाही पाळले तर पाश्चिमात्य देशात लॉकडाउन सुरू झालाय, त्यामुळं लॉकडाउन आपल्यालाही करावं लागेल. मात्र, हे टाळायचे असेल तर नियम पाळावे लागतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, लोकल आताच सुरू केलीय, आपण लक्ष ठेवून आहोत, टोकाचा निर्णय घ्यायची वेळ अजून तरी आली नसल्याचे टोपे म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.