गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याचा आरमोरीत निषेध..
वंचित पदाधिकाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
आरमोरी : गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित पक्षाच्या वतीने आज आरमोरीतील वडसा रोड टी पॉईंट चौकात निदर्शने करण्यात आली.
अमित शहा मुर्दाबाद, मोदी सरकारचा धिक्कार असो, अमित शहाचा धिक्कार असो अशी जोरदार घोषणाबाजी करत अमित शहा व मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. अमित शहा यांनी देशाची माफी मागावी अन्यथा गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित पक्षाकडून मागणी करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडी, व भारतीय बौध्द महासभाच्या वतिने आरमोरीत तिव्र निदर्शने आंदोलन , निषेध करण्यात आले.निषेधस्थळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे, आरमोरी विधानसभेचे प्रमुख राजरतन मेश्राम, ज्येष्ठ नेते भीमराव शेंडे, यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करून शाह यांच्या विरोधात घोषणाबाजीने परिसर दुमदुमवून टाकला.यावेळी कुमता मेश्राम महिला आघाडी तालुकाध्यक्ष, लता बारसागडे,संध्या रामटेके, भारती मेश्राम, राधा हुमणे कल्पना ठवरे संप्रति मेश्राम वासुदेव अंबादे मीना सहारे, दुर्गा मेश्राम भावना बारसागडे ज्योती उंदीरवाडे, ताराचंद बनसोड, जगदीश दामले, पुष्पा उमाजी रामटेके, नर्मदा मेश्राम, माधुरी बांबोडे, सिद्धार्थ साखरे, व इतर बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments are closed.