Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नांदेडमध्ये ऑनर किलिंग, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीचा खून करून राख विसर्जित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नांदेड 27 जानेवारी :- नांदेड मध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे कुटुंबीयांनीच आपल्या मुलीची हत्या केली. शुभांगी जोगदंड असं मयत मुलीचं नाव आहे. गावातील तरुनासोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या विरोधातून कुटुंबातील सदस्यांनीच तिचा खुन करून प्रेत जाळले.

23 वर्षीय शुभांगी ही शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएस मध्ये तिसऱ्या वर्षांत शिकत होती. गावातील तरूनासोबत तीचे प्रेम संबंध होते. पण कुटुंबियांना हे मान्य नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी दुसरीकडे तिची सोयरिक लाऊन दिली होती. काही दिवसांवर लग्न आले असताना काही कारणामुळे आठ दिवसापूर्वी सोयरिक मोडली. त्यामुळे शुभांगी च्या कुटुंबीयांना राग अनावर झाला. मुलींमुळे गावात बदनामी झाली या कारनाने गेल्या रविवारी रात्री कुटुंबीयांनी तिची हत्या करून मृतदेह शेतात जाळून टाकला. राख देखिल बाजूच्या ओढ्यात टाकून दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तीन दिवसा पासुन मुलगी गावात दिसत नसल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराने दिली.पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली तेव्हा ऑनर किलिंगचा हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी पोलीसानी मुलीच्या वडील, मामा, भाऊ आणि काकाची दोन मुलं अश्या पाच जणांना अटक केली. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.