Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या करून पतीची आत्महत्या; चार चिमुकले अनाथ

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

धानोरा : चारित्र्यावर घेतलेल्या संशयातून उफाळलेला घरगुती वाद अखेर दुहेरी मृत्यूच्या भीषण घटनेत रूपांतरित झाला. पतीने पत्नीचे दगडावर डोके आपटून निर्घृणपणे खून केला आणि त्यानंतर विष प्राशन करून स्वतः जीवन संपवले. ही धक्कादायक घटना धानोरा तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगतच्या रुपीनगट्टा गावात उघडकीस आली.

Oplus_131072

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेत राकेश सुकना कुजूर (३७) याने पत्नी कनिष्ठा (३२) हिची हत्या केली. शेतातील धानाची मळणी झाल्यानंतर पती-पत्नी शेतावर गेले होते. सायंकाळपर्यंत दोघेही घरी न परतल्याने शोध सुरू करण्यात आला. दुसऱ्या दिवशी गावालगतच्या गागीरमेटा डोंगर परिसरात कनिष्ठाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. घटनास्थळी असलेल्या मोठ्या दगडावर रक्ताचे डाग दिसून आल्याने हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान आरोपी राकेश पसार असल्याचे समजून शोध सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी त्याच्याच शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. पत्नीच्या हत्येनंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पेंढरी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या दाम्पत्यामागे मानवी (१२), मेहमा, शालिनी या तीन मुली व अर्णव हा मुलगा, तसेच वृद्ध वडील असा परिवार आहे. आई-वडील दोघांचेही छत्र हरपल्याने चार चिमुकली मुले व आजोबा पूर्णतः निराधार झाले असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.