सेवेमध्ये अहंकार आल्यास ती सेवा राहत नाही- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
नागपुर, 7 सप्टेंबर : सेवा करता करता आपण पवित्र होतो त्याच फळ आपल्याला मिळत, सेवेमध्ये अहंकार आल्यास ती सेवा राहत नाही. अहंकार विहिरीत सेवा ही एका अर्थाने स्वावलंबी बनवते असे सांगून आजारपणावर मात करून ‘सुंदर मी होणार’ या मानसिकेतून पुढील जीवन चांगल्या रीतीने जगण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज नागपूर येथे केले.
नागपुरातील इमामवाडा येथील स्नेहांचल वेदना उपशमन केंद्राला व रुग्णालयाला त्यांनी जन्माष्टमीच्या प्रसंगी भेट दिली तेव्हा ते बोलत होते. पुढे ते म्हणाले ईश्वरीय कार्य स्नेहांचल करीत असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कर्करोग रुग्णालय व संशोधन संस्थेच्या सहकार्याने येथे कर्करोग आणि वृद्धांची सेवा शुश्रूषा केली जाते.याप्रसंगी त्यांनी रुग्णांची विचारपूस केली आणि रुग्णालयातील सुविधांची सुद्धा पाहणी केली.
हे पण वाचा :-
Comments are closed.