Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपये बोनस तात्काळ देऊन शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करा – खा. अशोक नेते

खरीप हंगाम पूर्व झूम आढावा बैठकीत खा. अशोक नेते यांचे निर्देश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १५ मे : शासनाने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केलेला आहे, मात्र अजूनही तो शेतकऱ्यांना मिळालेला नाही. खरीप हंगामाची पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांना बोनस तातडीने देण्यात यावा व शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी झूम मिटिंग द्वारे खरीप हंगाम पूर्व नियोजनाच्या आढावा बैठकीत दिले.

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पुर्व नियोजनाची आढावा बैठक झूम मिटिंग द्वारे पार पडली. या बैठकीला खा. अशोक नेते, गडचिरोली विधानसभाचे आ. डॉ. देवरावजी होळी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. कृष्णाजी गजबे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, विभाग प्रमुख व्हिडीओ कान्फरसद्वारे बैठकीला उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या झूम बैठकीत खा. अशोक नेते यांनी नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी ५० हजार रुपये प्रोत्साहन रक्कम दिल्या जात नाही, ती त्वरित देण्यात यावी. शेतकऱ्यांसाठी शासनाने घोषित केलेले प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस अजूनही दिलेले नाही ते त्वरीत देण्यात यावे. शासनाकडून गरीब नागरिकांसाठी दोन महिन्याचे राशन मोफत देण्यात येत आहे. त्या राशनचा सुरळीत पुरवठा करून नागरिकांना त्वरित राशन वाटप करण्यात यावे. मका खरेदी तातडीने सुरू करून गोडाऊन उपलब्ध करून देण्यात यावे. असे निर्देश यावेळी खा. अशोक नेते यांनी दिले.

तसेच शेतकऱ्यांना बांधावर बियाणे देण्याची योजना सुरू करण्यात आली. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. ती त्वरित सुरू करून शेतकऱ्यांना बांधावर बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे. सिरोंचा, भामरागड, एटापल्ली व अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतासाठी वडसा येथील रैक पॉईंट दूर पडत असल्याने मंचेरीयाल येथे रैक पॉईंट सुरू करून शेतकऱ्यांना रासायनिक खत उपलब्ध करून देण्यात यावे. पीक कर्ज वाटपाचे नियोजन करून शेतकऱ्यांना त्वरित पिक कर्जाचे वाटप करण्यात यावे. कोविड-१९ चे नियम पाळून गुजरी व आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करण्याची परवानगी देण्यात यावी.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसेच आदिवासी क्षेत्रातील नागरिकांमध्ये कोरोना बाबत समज-गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे त्यासाठी त्या क्षेत्रात जनजागृती शिबीर घेऊन आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करण्यात यावे व लसीकरण साठी त्यांना प्रोत्साहित करण्यात यावे इत्यादी बाबीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली व शासन निर्णयाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात यावा व नागरिकांना सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश या बैठकीत खा. अशोक नेते यांनी दिले.

हे देखील वाचा : 

दिलासादायक ! गडचिरोली जिल्ह्यात आज तब्बल 550 कोरोनामुक्त, 276 नवीन कोरोना बाधित तर 12 रुग्णांचा मृत्यू

उद्योजक तुषार राऊळ यांच्याकडून जिजाऊ कोविड सेंटरला ११ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स च्या ५६ जागांसाठी भरती

 

 

Comments are closed.