Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्हात आज एका मृत्यूसह १२६ कोरोनाबाधित तर ६२ कोरोनामुक्त

  • आतापर्यंत 23,972 जणांची कोरोनावर मात
  • ॲक्टीव पॉझिटिव्ह 1138

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. २० मार्च: जिल्ह्यात मागील २४ तासात ६२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 126 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार ५१८ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ९७२ झाली आहे. सध्या ११३८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ४७ हजार २०४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख १७ हजार २५९ नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहराच्या सिस्टर कॉलनी येथील ६० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०८ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३६९, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज बाधीत आलेल्या १२६ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील ६५, चंद्रपूर तालुका १६, बल्लारपूर चार, भद्रावती आठ, ब्रम्हपुरी सात, सिंदेवाही आठ, राजुरा दोन, चिमूर एक, वरोरा १०, कोरपना एक, जिवती दोन व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Comments are closed.