Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 31 कोरोनामुक्त तर 36 नव्याने पॉझिटिव्ह

आतापर्यंत 1,82,635 नमुन्यांची तपासणी
उपचार घेत असलेले बाधित 339

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 7 जानेवारी: जिल्ह्यात मागील 24 तासात 31 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 36 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 556 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 841 झाली आहे. सध्या 339 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 82 हजार 635 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 57 हजार 696 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये खडसंगी ता. चिमूर येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 376 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 343, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 11, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 36 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 12, चंद्रपूर तालुका तीन, बल्लारपुर दोन, भद्रावती दोन, मूल तीन, सावली दोन, गोंडपिपरी दोन, राजूरा तीन, वरोरा पाच व कोरपना येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Comments are closed.