Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात १२ मृत्यूसह आज ३०५ नवीन कोरोना बाधित तर २६३ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १९ एप्रिल: आज जिल्हयात ३०५ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज २६३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १५३१४ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ११९५५ वर पोहचली. तसेच सद्या ३१३४ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण २२५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज १२ नवीन मृत्यूमध्ये ५९ वर्षीय पुरुष, कुरखेडा, ७१ वर्षीय पुरुष मड्डीगुडम ता. अहेरी, ४५ वर्षीय पुरुष अहेरी, ७० वर्षीय महिला चामोर्शी, ४२ वर्षीय पुरुष कोंडाळा ता. वडसा, ६० वर्षीय पुरुष बोलदा ता. वडसा, ३८ वर्षीय पुरुष मानपूर ता. आरमोरी, ६० वर्षीय महिला अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया,  ६० वर्षीय पुरुष हनुमान नगर, गडचिरोली, ४५ वर्षीय पुरुष आरमोरी, ७० वर्षीय महिला विवेकानंद नगर, गडचिरोली, ७२ वर्षीय पुरुष  कन्नमवार वार्ड गडचिरोली यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.०७ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण २०.४६ टक्के तर मृत्यू दर १.४७ टक्के झाला.     

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन ३०५ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १८४, अहेरी तालुक्यातील ९, आरमोरी ३५, चामोर्शी तालुक्यातील ११, धानोरा तालुक्यातील ८, एटापल्ली तालुक्यातील ५, कोरची तालुक्यातील ७, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये १६, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये ७, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये २ तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये २१ जणांचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या २६३ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील १०१, अहेरी ११,  आरमोरी १९, भामरागड ५, चामोर्शी ११, धानोरा २३, एटापल्ली १२, मुलचेरा २, सिरोंचा ५, कोरची ८, कुरखेडा २९, तसेच वडसा येथील ३७ जणांचा समावेश आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.