Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात १८ मृत्यूसह ५८६ नवीन कोरोना बाधित तर २५१ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ५ मे : आज जिल्हयात 586 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 251 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 23598 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 18535 वर पोहचली. तसेच सद्या 4580 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 483जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 18 नवीन मृत्यूमध्ये 61 वर्षीय पुरुष आरमोरी, 55 वर्षीय महिला कुनघाडा ता. चामोर्शी, 70 वर्षीय पुरुष पारडी गडचिरोली, 66 वर्षीय पुरुष बेडगाव ता.कोरची, 57  वर्षीय महिला मीचगाव  ता.धानोरा , 44 वर्षीय पुरुष बोधलबंद ता. कोरची, 53 वर्षीय पुरुष चामोर्शी, 42 वर्षीय पुरुष ता.लाखांदूर जि.भंडारा, 56 वर्षीय महिला डोंगरतामशी ता.आरमोरी, 58 वर्षीय पुरुष ता.लाखांदूर जि.भंडारा, 52 वर्षीय पुरुष शिरपूर ता.कुरखेडा, 67 वर्षीय पुरुष आरमोरी, 78 वर्षीय महिला वडसा, 65 वर्षीय पुरुष खुदीरामपल्ली ता.मुलचेरा, 67 वर्षीय महिला ता.ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर, 59 वर्षीय पुरुष आरमोरी, 53 वर्षीय पुरुष गिलगाव ता.चामोर्शी, 45 वर्षीय महिला नवेगाव गडचिरोली यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.54 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 19.41 टक्के तर मृत्यू दर 2.05 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

       नवीन 586 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 211, अहेरी तालुक्यातील 67, आरमोरी 32, भामरागड तालुक्यातील 6, चामोर्शी तालुक्यातील 37, धानोरा तालुक्यातील 19, एटापल्ली तालुक्यातील 44, कोरची तालुक्यातील 17, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 28, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 22, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 32 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 71 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 251 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 160, अहेरी 109,  आरमोरी 23, भामरागड 8, चामोर्शी 14, धानोरा 07, एटापल्ली 1, मुलचेरा 3, सिरोंचा 11, कोरची 0, कुरखेडा 11, तसेच वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.