Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 173 कोरोनामुक्त, 7 मृत्यूसह 168 नवीन कोरोना बाधित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 23 मे : आज जिल्हयात 168 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 173 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28710 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 26190 वर पोहचली. तसेच सद्या 1830 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 690 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 7 नवीन मृत्यूमध्ये  75 वर्षीय पुरुष गुड्डीगुडाम ता.अहेर, 45 वर्षीय पुरुष माडेमगांव ता.चामोर्शी , 72 वर्षीय पुरुष कुलकुली ता.आरमोरी, 72 वर्षीय पुरुष धुनडेशिवनी गडचिरोली, 61 वर्षीय पुरुष शाहु नगर वार्ड न. 21 गडचिरोली, 55 वर्षीय पुरुष नवेगाव गडचिरोली, 70 वर्षीय महिला आार्शिवाद नगर गडचिरोली  याचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.22 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 6.37 टक्के तर मृत्यू दर 2.40 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Gadchiroli Corona

नवीन 168 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 28, अहेरी तालुक्यातील 4, आरमोरी 8, भामरागड तालुक्यातील 0, चामोर्शी तालुक्यातील 76, धानोरा तालुक्यातील 5, एटापल्ली तालुक्यातील 3, कोरची तालुक्यातील 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 4, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 17, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 13 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 10 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 173 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 63, अहेरी 3,  आरमोरी 2, भामरागड 06, चामोर्शी 19, धानोरा 21, एटापल्ली 9, मुलचेरा 8, सिरोंचा 18, कोरची 13, कुरखेडा 13 तसेच वडसा येथील 17 जणांचा समावेश आहे.3

हे देखील वाचा :

धकादायक:-एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या

ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार अटकेत; हत्येच्या गुन्ह्यात फरार होता

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.