Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 21 नवीन कोरोना बाधित तर 9 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 05 मार्च: आज जिल्हयात 21 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 9 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9645 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9377 वर पोहचली. तसेच सद्या 160 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.22 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.66 टक्के तर मृत्यू दर 1.12 टक्के झाला.

नवीन 21 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 13, अहेरी तालुक्यातील 1, चामोर्शी तालुक्यातील 4, धानोरा तालुक्यातील 1, कुरखेडा तालुक्यातील 2, जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 9 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 5, आरमोरी 1, एटापल्ली 1, कुरखेडा 2, जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील वनश्री कॉलनी 1, स्थानिक 1, शिवाजी हॉस्कूल 6, कनेरी 1, नवेगांव 2,विसापूर 1, कॅम्प एरिया 1, अहेरी तालुक्यातील 37 बीएन सीआरपीएफ प्राणहिता 1,चामोर्शी तालुक्यातील स्थानीक 1,प्रगती बॅक जवळ 2, बस स्टॅन्ड कोनसरी 1, धानोरा तालुक्यातील सीआरपीएफ 1, कुरखेडा तालुक्यातील तळेगांव 2, यांचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधिता मध्ये जणांचा समावेश आहे.

Comments are closed.