Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 260 कोरोनामुक्त, 13 जणांचा कोरोनाने मृत्यू तर 180 नवीन कोरोना बाधित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 22 मे:  आज जिल्हयात 180 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 260 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28542 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 26017 वर पोहचली. तसेच सद्या 1842 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 683 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 13 नवीन मृत्यूमध्ये 43 वर्षीय पुरुष जाफराबाद ता. सिंरोचा, 48 वर्षीय पुरुष घोट ता. चामोर्शी, 45 वर्षीय पुरुष मुर्झा ता. गडचिरोली, 60 वर्षीय पुरुष ता. ब्रम्हपुरी जि.चंद्रपुर, 39 वर्षीय पुरुष लगाम ता. मुलचेरा, 53 वर्षीय महिला आरमोरी, 65 वर्षीय महिला इंदीरा नगर गडचिरोली, 75 वर्षीय पुरुष चींनगाव ता. कुरखेडा , 32 वर्षीय पुरुष विठ्ठलपुर ता. चामोर्शी, 62 वर्षीय महिला कोरेगाव ता. वडसा, 62 वर्षीय महिला कोतुर ता. अहेरी, 40 वर्षीय पुरुष सोनसरी ता. कुरखेडा, 55 वर्षीय महिला गोविंदपुर ता. मुलचेरा  याचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.15 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 6.45 टक्के तर मृत्यू दर 2.39 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Corona Gadchiroli

नवीन 180 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 41, अहेरी तालुक्यातील 12, आरमोरी 14, भामरागड तालुक्यातील 08, चामोर्शी तालुक्यातील 30, धानोरा तालुक्यातील 08, एटापल्ली तालुक्यातील 04, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 7, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 21, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 31 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 04 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 260 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 72, अहेरी 14,  आरमोरी 14, भामरागड 04, चामोर्शी 52, धानोरा 19, एटापल्ली11, मुलचेरा 17, सिरोंचा 16, कोरची 07, कुरखेडा 14 तसेच वडसा येथील 20 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : 

पाकिस्तानला भारतीय सैन्याची माहिती देणाऱ्या २ बहिणींना अटक

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.