Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात १५ मृत्यूसह आज ४९७ नवीन कोरोना बाधित तर २८३ कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २३ एप्रिल: आज जिल्हयात ४९७ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज २८३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित  १७४३३ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १३०५६ वर पोहचली. तसेच सद्या ४०८२ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

 आत्तापर्यंत जिल्हयात एकुण २९५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज १५ नवीन मृत्यूमध्ये ६७ वर्षीय महिला ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर, ६७ वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर,  ५४ वर्षीय पुरुष नवेगाव गडचिरोली,  ६५ वर्षीय महिला आरमोरी,  ३४ वर्षीय पुरुष पोलिस कॉलोनी गडचिरोली, ५९  वर्षीय पुरुष विवेकांनद नगर गडचिरोली,  ४० वर्षीय पुरुष वडसा, ५४ वर्षीय पुरुष कुरखेडा, ६५ वर्षीय महिला वडसा, ७२  वर्षीय पुरुष विसारा ता.वडसा, ६९ वर्षीय पुरुष आरमोरी,  ५२ वर्षीय पुरुष अहेरी, ४४ वर्षीय पुरुष आमगाव ता.वडसा, ३३ वर्षीय महिला चंद्रपूर, ४० वर्षीय पुरुष रामनगर गडचिरोली यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.८९ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण २२.४२ टक्के तर मृत्यू दर १.६९ टक्के झाला.    

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन ४९७ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १५७, अहेरी तालुक्यातील २६, आरमोरी ५५, भामरागड तालुक्यातील 0, चामोर्शी तालुक्यातील ५७, धानोरा तालुक्यातील ३५, एटापल्ली तालुक्यातील २३, कोरची तालुक्यातील २९, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये ३९, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये २५, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये ०९ तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये ४२ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या २८३ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील १३८, अहेरी ०६,  आरमोरी २५, भामरागड ०५, चामोर्शी ११, धानोरा ०८, एटापल्ली १०, मुलचेरा ०२, सिरोंचा ३, कोरची १२, कुरखेडा १९, तसेच वडसा येथील ४४  जणांचा समावेश आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.