Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत ट्रकच्या चाकाखाली गेल्याने पत्नी जागीच ठार तर पती गंभीर..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 12 ऑगस्ट – गडचिरोली वरून कुंनघाडा आपल्या स्वगावी दुचाकीने पती पत्नी जात असताना पत्नी ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 11 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास गडचिरोली- चामोर्शी मार्गावरील वाकडी गावाजवळ घडली असून कुंदाबाई आखाडे (वय ६०) असे मृत महिलेचे नाव असून ती चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा येथील रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आखाडे दाम्पत्य रुग्णालयात दाखल असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. यानंतर दुपारी दोघे पती-पत्नी एमएच ३३ एबी ५९२६ क्रमांकाच्या दुचाकीने कुनघाडा गावाकडे जात होते. यावेळी वाकडी वळणावर दोन मालवाहू ट्रक भरधाव वेगाने जात होते. ट्रकांना ओव्हरटेक करत असताना कुंदा आखाडे दुचाकीवरून खाली पडल्या. त्याचवेळी मागूनयेणाऱ्या दुसऱ्या ट्रकात सापडल्याने गेल्याने त्यांचे अर्धे शरीर छिन्नविछिन्न झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यात त्यांचे पतीही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.