Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबईत येत्या २५ जून ला मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क      

सांगली :  मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विरोधात मराठा आरक्षण संघर्ष समिती आता आक्रमक झाली आहे. येत्या २५ जुन रोजी मुंबई मध्ये राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेच्या माध्यमातून निर्णयक लढ्याची घोषणा होणार असल्याचं संघर्ष समितीकडून जाहीर करण्यात आले आहे. समितीचे नेते सुरेश पाटील विजयसिंह महाडिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारवर दबाव टाकण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समिती व मराठा आरक्षण समन्वय समितीकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यात कमी पडले आहे, याशिवाय मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी ज्या तरतूदी करण्यात आल्यासाठी निधीही देण्यात आला नाही. असा आरोप, मराठा आरक्षण संघर्ष समिती व मराठा आरक्षण समन्वय समितिचे नेते सुरेश पाटील, विजयसिंह महाडिक आणि वैभव शिंदे यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट सुद्धा काही कामाची नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्य सरकारकडून खालच्या पातळीवरून ज्या प्रक्रिया करायचे आहेत. त्या होताना दिसत नाहीत, यामुळे आता सरकारच्या विरोधात निर्णयातील लढा उभारण्यासाठी नवी मुंबई या ठिकाणी येत्या 25 जून रोजी मराठा समाजाची राज्यव्यापी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये राज्यातील तसेच केंद्रातील अनेक आजी-माजी मंत्री, मराठा समाजातले खासदार, आमदार,नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या गोलमेज परिषदेमध्ये राज्य सरकारची पोलखोल करण्यात येणार असून,या परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षण आणि सरकारच्या विरोधात निर्णयक लढ्याची घोषणा होणार असल्याचं जाहीर करण्यात आला आहे. मराठा आरक्षण समितीचे नेते सुरेश पाटील,विजयसिंह महाडिक आणि वैभव शिंदे यांनी पत्रकार परिषदे मध्ये ही माहिती दिली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी आगरी समाजाने केली मानवी साखळी

धक्कादायक! ट्रॅक्टरखाली चिरडून १५ वर्षीय शाळकरी मुलगा जागीच ठार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.