Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेवटी मृत्यूने गाठलच! विजेचा खांब कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू.

वादळी वाऱ्यामुळे विजेचा कमकुवत झालेला खांब थेट दुचाकीवर कोसळला आणि यात भीषण स्फोटही झाला होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर 10 ऑगस्ट :- 

पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर-औद्योगिक वसाहतीत कोलवडे नाका येथे दुर्घटना घडली आहे. महावितरणचा लोखंडी खांब मुख्य रस्त्यात अचानक पडल्याने धावत्या बाईकवर असलेल्या योगेश कांतिलाल पागधरे, रा. नवापूर याचा मृत्यू झालाय.योगेश पागधरे हे टाटा स्टील या कंपनीत कामाला होते. ते कामावर जाण्यासाठी आपल्या दुचाकीवर निघाले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे विजेचा कमकुवत झालेला खांब थेट दुचाकीवर कोसळला आणि यात भीषण स्फोटही झाला, या भीषण स्फोटात दुचाकीस्वार तरुण काही फूट अंतरावर फेकला गेला. विद्युत वाहक तारांसह हा विजेचा खांब कोसळल्यानं स्फोट होऊन आजूबाजूचा परिसरही हादरुन गेला होता. या घटनेत दुचाकीचा चक्काचूर झाला असून, दुचाकीस्वार योगेश गंभीररीत्या जखमी झाले होते.या अपघातामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वीज वितरण कंपनीचे कर्मचारीही दाखल झाले. जखमी योगेश पागधरे यांना रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांची प्रकृत खालावत चालली होती. अखेर त्यांना मीरा रोड येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं. पण उपचादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते.

याआधीही कोळवडे येथे चार-पाच वर्षांपूर्वी विद्युत तारा तुटून सहा म्हशी दगावल्‍या होत्‍या. कोळवडे भागासाठी हे संकट नवीन नाही. वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून दुर्लक्ष केले जाते. बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये वारंवार होणाऱ्या दुर्घटनेला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता नागरिक करत आहेत. या संपूर्ण दुर्घटनेत योगेश यांचा मात्र निष्पाप बळी गेल्याने पागधरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.