Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘भारत जोडो यात्रे’च्या नांदेड जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नांदेड,  28 ऑक्टोबर :-  आज भारत जोडो यात्रेच्या कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले, महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुवा तसेच भारत जोडो यात्रेतील मा.खा. राहुलजी गांधी यांचे प्रमुख सहकारी के.बी. बैजू, सुशांत मिश्रा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राज्य व देशभरातून येणाऱ्या अतिथींना सहकार्य व मार्गदर्शन करण्याच्या हेतूने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी हे कार्यालय उभारण्याचे निर्देश दिले होते. आयटीएम कॉलेजचे सभागृह, नांदेड येथे उभारण्यात आलेल्या या कार्यालयाचे प्रमुख समन्वयक म्हणून माजी मंत्री डी.पी. सावंत जबाबदारी सांभाळतील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भारत जोडो यात्रेच्या नांदेड जिल्हा संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. अमर राजूरकर, नांदेड जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष व माजी आमदार वसंतराव चव्हाण, आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. मोहन हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर, प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, महापौर सौ. जयश्रीताई पावडे, मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, सौ. मिनलताई खतगावकर, प्रदेश सरचिटणीस अभिजीत सपकाळ, शाम दरक आदी उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.