Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“वड बँक नर्सरी” चे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते लोकार्पण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड, दि. १७ मार्च: रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या अनोख्या रोपवाटिकेचा म्हणजेच “वड बँक नर्सरीचे” कामगार नेते महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वटवृक्षांची नवी मुंबईचा संकल्प हाती घेतलेल्या वटवृक्ष सामाजिक संस्था यापुढे जास्तीत जास्त वटवृक्ष लागवडीबरोबर अनेक वृक्षप्रेमींना मोफत रोप व बीज वाटप अभियान राबवणार असल्याने ह्या वडबँक नर्सरीची शेलघर गावालगतच उलवे सेक्टर १६ येथील सिडकोच्या राखिव भुखंडावर उभारली गेली आहे. यावेळी माझी वसुंधरा अभियानाची शपथ घेवुन कार्यक्रमाची सांगता केली.

नागरिकांनी आपल्याकडील अधिक असलेले रोपे किंवा फळांच्या बीया ह्या वडबँक नर्सरीत ठेवुन रोपवाटिकेत उपलब्ध असलेली रोपे दिलेल्या काळावधीत स्विकारावी अशी संकल्पना आहे. यामुळे वड झाडांची योग्य ती काळजी घेतली जाईल व त्यांची योग्य वाढ झाल्यावर त्या झाडांना ठिकठिकाणी रोपण करणे शक्य होईल व वडांच्या झाडांची संख्या वाढेल व पर्यावरणाला आधार मिळेल.  

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी महेंद्र घरत यांनी वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या निसर्गसंवर्धनाच्या सेवाभावी कार्याला हातभार लावण्यासाठी संस्थेला ५१ हजार रुपयांची देणगी जाहिर केली. तसेच राजीप सदस्य रविंद्र पाटील यांनीही किरण मढवी आणि संस्थेचे विशेष कौतुक केले. यावेळी आदर्श शिक्षक मढवी गुरूजींनी सर्वांचे आभार मानुन संस्थेला शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.