Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत २२ जुलैला औद्योगिक परिवर्तनाचा महासोहळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एलएमईएल प्रकल्पांचे उद्घाटन; ‘एकात्मिक पोलाद प्रकल्पा’ची पायाभरणी नक्षलप्रवण भागातून औद्योगिक उभारीकडे ऐतिहासिक वाटचाल...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीला आणि एलएमईएलच्या समाजनिष्ठ दृष्टिकोनाला एकत्र बांधणारा हा प्रकल्प गडचिरोलीला महाराष्ट्रातील पहिला ‘ग्रीन इंडस्ट्रियल जिल्हा’ बनविण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्याच्या इतिहासात २२ जुलै २०२५ हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाची पायाभरणी होणार असून, याच मंचावर लोहखनिज प्रक्रिया उद्योगाच्या विविध टप्प्यांचे उद्घाटनही संपन्न होणार आहे. हा केवळ एक शिलान्यास नव्हे, तर नक्षलग्रस्त भागातून औद्योगिक पुनरुत्थानाच्या दिशेने उचललेले भक्कम पाऊल आहे.

हेडरी-कोनसरी मार्गावरील १० एमटीपीए क्षमतेच्या स्लरी पाइपलाइनचा शुभारंभ, ५ एमटीपीए क्षमतेचा लोहखनिज ग्राइंडिंग प्लांट, कोनसरीतील ४ एमटीपीए क्षमतेचा पेलेट प्रकल्प आणि आगामी ४.५ एमटीपीए क्षमतेच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाच्या पायाभरणीचा ऐतिहासिक क्षण साक्षीदार ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय, सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित निवासी शाळा, आणि सोमनपल्ली येथील कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात येणारी वसाहत यांचीही मुहूर्तमेढ या दिवशी रोवली जाणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या सोहळ्यास राज्याचे सहपालकमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम व मिलिंद नरोटे, एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, पद्मश्री तुलसी मुंडा आणि कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

निव्वळ स्टील नव्हे, तर समाजबदलाचा ध्यास…

गडचिरोलीच्या उभारणीत केवळ भौतिक विकास नाही, तर सामाजिक परिवर्तनाचा ध्यासही अंतर्भूत आहे. एकेकाळी बंदुका घेऊन जंगलात वावरणाऱ्या तरुणांच्या हातात आता प्रशिक्षणानंतर नोकरी आहे. आत्मसमर्पित माजी नक्षलवाद्यांना एलएमईएलतर्फे उद्योगकेंद्रित कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळत आहेत. ही केवळ CSR नव्हे, तर समावेशक समाजघटनाच आहे.

गडचिरोली : भारताच्या ग्रीन स्टील युगातील प्रवेशद्वार…

एलएमईएलचे एमडी बी. प्रभाकरन यांनी याला “गडचिरोलीच्या औद्योगिक पुनर्जन्माची सकाळ” असे संबोधले. “गडचिरोली हे भारतीय पोलाद उद्योगाचे जन्मस्थान १४० वर्षांपूर्वी व्हायचे होते, मात्र ते आता प्रत्यक्षात येत आहे. आजचा दिवस महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि पर्यावरणीय भविष्यासाठी निर्णायक आहे. ‘ग्रीन स्टील’ निर्मितीसाठी गडचिरोली देशाचे नेतृत्व करणार आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सुरजागडचा हरित आदर्श आणि कोनसरीची धडाडी…

एलएमईएलने सुरजागड खाण प्रकल्पाचे हरित आणि सामाजिकदृष्ट्या उत्तरदायी संचालन करून देशपातळीवर आदर्श निर्माण केला आहे. कोनसरीतील कार्यरत डीआरआय आणि पेलट प्लांट ही त्याची साक्ष आहेत. आगामी पोलाद प्रकल्प केवळ उत्पादन वाढवणार नाही, तर रोजगार, आरोग्य आणि शिक्षणाच्या नवदिशाही खुल्या करणार आहे.

Comments are closed.