Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मालेवाडा येथे आंतर महाविद्यालय पुरूष खो-खो स्पर्धा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मालेवाडा, 06 नोव्हेंबर :- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत ॲड. विठ्ठलराव बनपुरकर मेमोरियल कला व वाणिज्य महाविद्यालय मालेवाडा येथे आंतर महाविद्यालयीन पुरूष खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण महाविद्यालय प्राचार्य डॉ. जे.व्ही. दळवे यांच्या हस्ते संपन्न झाला. मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. एच.एम. कामडी उपस्थित होते. कार्यक्रमाची अध्यक्षता संजीवनी आदिवासी जाती व मागासवर्गीय शिक्षण संस्था खरमतटोला चे सचिव सारंग बनपुरकर यांनी केली. प्रमुख अतिथी म्हणून मालेवाड सरपंच अनुसया पेंदाम, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुधाकर भरणे, डॉ. ठाकरे, डॉ. अर्मरकर, डॉ. चाउके उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी प्रा. हिवराज राउत, डॉ.  वैद्य, डॉ. पल्लवी काळे, प्रा. रामटेके, प्रा. कन्नाके, प्रा. कुमरे, प्रा.लोहंबरे, प्रा. नरेश आत्राम, डॉ. वर्षा ठाकरे, प्रा. आष्टीकर, प्रा. हेमलता बावनथळे, प्रा. छाया बनसोड, उच्च लिपीक हिरामण उईके, देवेंद्र शेलोकर, दीपक बनपुरकर, मनोज समर्थ, राहुल वालदे, अविनाश जांभुळे, गोपाल करमरकर तसेच वाॅलेंटियर व आंतर महाविद्यालयाचे खो-खो खेळाडू, विद्यार्थी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डा. एच.एम. कामडी यांनी केले. संचालन प्रा. हेमा कराडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डी.एम. नंदेश्वर यांनी मानले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.