Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रीत

जिल्ह्यातील एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली – जिल्ह्यातील युवांनी व संस्थांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवांना विकासकार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारासाठी क्रीडा विभागामार्फत 30 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्याचे युवा धोरण 2012 अन्वये 12 नोव्हेंबर, 2013 च्या शासन निर्णयानुसार, सदर पुरस्कार जिल्ह्यातील एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतो. तरी पात्रतेचे निकष पुर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील युवक,  युवती व संस्थांनी  जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालयातुन अर्ज प्राप्त करुन, आवश्यक कागदपत्र व शासन निर्णयानुसार पात्रतेच्या निकषाचे पुरावे व मुल्यांकनाच्या पुराव्याचे संपूर्ण कागदपत्रासह तसेच युवक-युवतीचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र व संस्थेसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्यांनी सर्व सदस्यांचे पोलीस चारित्र्य  प्रमाणपत्रासह आपला परिपुर्ण प्रस्ताव दि. 30 ऑगष्ट 2024 पर्यंत दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, गडचिरोली येथे सादर करावा.

तसेच अधिक माहिती करीता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दि. 12 नोव्हेंबर, 2013 रोजीचा शासन निर्णयाचे अवलोकन करावे किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

युवक व युवतींसाठी पात्रतेचे निकष :

 अर्जदार युवक / युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्ष पुर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षापर्यंत असावे. (तसा पूरावा जोडावा)
 जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग पाच वर्ष वास्तव्य असावे. (दाखला जोडावा)
 पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागुन दिला जाणार नाही.
 पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही.
 केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडाणे आवश्यक राहील.  (उदा. वृत्तपत्रीय कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो, इत्यादी)
 अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील.
 अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. (तसे हमीपत्र जोडावे)
 एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. (तसे हमीपत्र जोडावे)
 केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय  व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक / कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही. (तसे हमीपत्र जोडावे)

 अर्जदाराने पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्य दाखला (संबंधीत परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन) देणे आवश्यक राहील.

संस्थांसाठी पात्रता निकष.

 

 पुरस्कार संस्थेस विभागुन दिला जाणार नाही.
 संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो,इत्यादी)
 अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील.
 अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लीक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार पंजीबद्ध असावी.
 अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्ष कार्यरत असणे आवश्यक आहे.
 अर्जदार संस्थेचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. (तसेच हमीपत्र जोडावे)
 एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. (तसे हमीपत्र जोडावे)

 अर्जदार व संस्थासदस्यांचा पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्य पडताळणी दाखला (संबंधीत परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन) देणे आवश्यक राहील.

पुरस्कारासाठी मुल्यांकन

 

 युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य दि.  1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत गत तीन वर्षाची केलेली कार्य कामगिरी विचारात घेण्यात येईल.
 युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य.
 राज्यात साधन संपत्ती जतन व संवर्धनत तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य.
 समाजातील दुर्बल घटक, अनुसुचित जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग, इ. बाबतचे कार्य.
 शिक्षण, प्रौढशिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतीक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभृन, व्यवनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य.
 राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य.
 नागरी गलीच्छवस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण, इ. बाबत कार्य, साहस, इ. बाबतचे कार्य.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.