Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दुचाकी घेताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणं अनिवार्य

रस्त्यावरील होत असणाऱ्या सततच्या अपघातांमुळे होणाऱ्या जीवितहानी रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

पुणे : शोरूममधून दुचाकीची विक्री करणाऱ्यांना दोन हेल्मेट देणं बंधनकारक असणार आहे. वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दुचाकींच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

पुण्यात अनेकदा हेल्मेटसक्ती झाली, पण नंतर ती शिथिल देखील झाली, त्यानंतर आता पुण्यात दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीने देखील हेल्मेट घालावे यासाठी पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नवी युक्ती शोधली आहे. पुण्यात दुचाकी विकणाऱ्या शोरूमला दुचाकी खरेदी केल्यानंतर हेल्मेट देण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नवी दुचाकी विकताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणे आता अनिवार्य असणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वाढणारे अपघात, गाड्यांची संख्या, वाहतूक कोंडी यामुळे नियम अधिक कडक करणं आवश्यक आहे. त्यासाठी आता पुण्यातील दुचाकीस्वारांसह मागे बसणाऱ्यांनी हेल्मेट नियमित घालावे यासाठी पुणे परिवहन विभागाने मोठे आदेश दिले आहेत. यासंबधीचे एक पत्रक देखील त्यांनी काढलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.