Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

समाज भवनाचा बांधकामावर जेसीबी; कलार समाज संतप्त

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिरोंचा : नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ७ मध्ये सुरू असलेल्या कलार समाजाच्या समाज भवनाच्या बांधकामावर जेसीबी चालवून ते उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, शहरात संतापाची लाट उसळली आहे. अधिकृत टेंडर प्रक्रियेनंतर सुरू असलेले हे काम अचानक पाडण्यात आल्याने केवळ सार्वजनिक प्रकल्पात अडथळा निर्माण झाला नाही, तर समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही समोर आला आहे.

नगर पंचायतमार्फत मंजूर झालेल्या या बांधकामाची सुरुवात कंत्राटदारामार्फत विधिवत पूजन करून करण्यात आली होती. मात्र, ३ एप्रिल रोजी काही अज्ञात व्यक्तींनी जेसीबीच्या सहाय्याने सुरू असलेले बांधकाम पाडून टाकले. फाउंडेशनसाठी खणलेले खड्डे बुजवताना त्यामध्ये पूजेचे साहित्यही गाडले गेल्याचा आरोप कलार समाजाने केला असून, या प्रकाराने संताप अधिक तीव्र झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेच्या निषेधार्थ ४ एप्रिल रोजी कलार समाजाच्या शिष्टमंडळाने नगर उपाध्यक्ष बबलू पाशा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यामध्ये बंद पडलेले बांधकाम तात्काळ सुरू करण्याची मागणी करत, सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आणि धार्मिक भावना दुखावणाऱ्या दोषींवर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, उपलब्ध व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे संबंधितांची ओळख पटवून कठोर कारवाई करण्याचा आग्रह धरण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

निवेदन स्वीकारताना नगर उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी हा प्रकार “निंदनीय आणि गंभीर” असल्याचे स्पष्ट करत, “सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन दिले. त्यांनी समाज बांधवांना संयम राखण्याचे आवाहनही केले.

दरम्यान, कलार समाजाने प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम देत, या मुदतीत कारवाई न झाल्यास तालुक्यात व्यापक आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. या घटनेमुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आले असून, हे कृत्य सूडबुद्धीतून केले गेले असावे, असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.