महिला व बाल रुग्णालयातील दगावलेल्या मातांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून न्याय देण्यात यावे : खा. अशोक नेते
शासकीय विश्रामगृह येथे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोळंकी,व डॉ.धुर्वे यांचा रुग्णालया संबंधित समस्या जाणून घेत आढावा घेतला
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 3 ऑक्टोंबर : गडचिरोली जिल्ह्यातील महिला व बाल रुग्णालयात झालेल्या मातांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,मृत्यू पावलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी खासदार अशोकजी नेते यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसापासून महिला व बाल रुग्णालयात गर्भवती महिला मातांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे महिला व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हे वाढते मृत्यू तातडीने थांबविण्याची गरज असून त्यासाठी रुग्णालय प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी खा.नेते यांनी यावेळी केली.
रुग्णालयातील चुकीचे व्यवस्थापन अस्वच्छता आणि इतर सुविधांबाबतही विविध तक्रारी असून,तो जिल्ह्यातील जनतेसाठी चिंतेचा विषय बनला आहे,रुग्णालयातील परिस्थितीची उच्चस्तरीय चौकशी करून भविष्यात असे मृत्यू होणार नाहीत याची काळजी घ्यावी.या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, महिला मोर्चा च्या प्रदेश चिटणीस सौ.रेखाताई डोळस,ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहणकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री केशव निंबोळ, माजी.न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष भास्कर भुरे, उपस्थित होते.
Comments are closed.