Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन विक्रीचे प्रस्ताव आमंत्रित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 07 जुलै : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या दारिद्रय रेषेखालील भूमिहीन कुटूंबाला शासनामार्फत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलिताखालील जमीन 100 % अनुदानावर उपलब्ध करुन द्यावयाची आहे.

त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांना जमीन विकावयाची आहे, त्यांनी विकत असलेल्या जमिनीचा सातबारा ( 7/12 ) जमिनीचा नकाशा, धारण करीत असलेल्या जमिनीचा तपशिल (नमुना 8 अ), जमीन मोजणीची ‘ क ‘ प्रत, गांव नकाशा, 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर शपथपत्र इ. माहितीसह प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचे कार्यालयास सादर करावा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शासन निर्णय दिनांक 14 ऑगस्ट 2018 नुसार जमीन खरेदीची कार्यवाही करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली केले आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अन्नधान्याचे वाटप

एकतर मानधनवाढ तात्काळ लागू करा किंवा आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या; मानसेवी डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आत्महत्येची परवानगी

गडचिरोली जिल्ह्यात आज 8 कोरोनामुक्त तर 12 नवीन कोरोना बाधितांची नोंद

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.