Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी घेतली कोविड लस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलढाणा, दि. २० फेब्रुवारी: कोविड लसीकरण बुलडाणा जिल्ह्यात सुरू असून सध्या 13 ठिकाणी हे लसीकरण होत आहे. प्रत्येक केंद्रावर 100 याप्रमाणे 1300 लसीकरणाचे दररोजचे उद्दिष्ट आहे. कोविड लसीकरणामध्ये दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाईन वर्करमधील व्यक्तींचे लसीकरण सध्या सुरू आहे. त्यानुसार आज जिल्हाधिकारी एस.राममुर्ती यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील लसीकरण कक्षात लस टोचून घेतली. लसीकरणानंतर 30 मिनीटे निरीक्षण रूममध्ये ते होते. या लसीमुळे कुठलाही प्रकारचा त्रास त्यांना झाला नाही. लस ही 100 टक्के सुरक्षीत असल्याचा अनुभव त्यांनी घेतला. तरी लसीकरणामधील लाभार्थी व्यक्तींनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता लस घ्यावे.तसेच नागरिकांनी त्री सुत्रीचे पालन करावे असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी एस.राममुर्ती यांनी केले.   

Comments are closed.