Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

७० हजारांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील सहायक ACB च्या जाळ्यात

शेतजमिनीच्या कामासाठी ७० हजारांची लाच स्वीकारताना ACBच्या जाळ्यात अडकला असून कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, ७ ऑगस्ट :

कुरखेडा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत मुख्यालय सहायक रवींद्र सदाशिव दिनकोंडावार (वय ४२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. त्यांनी शेतजमिनीचा पोटहिसा मोजणी व सातबारा वेगळा करून देण्यासाठी ७० हजार रुपये लाच स्वीकारली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तक्रारदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शासकीय कामासाठी दिनकोंडावार यांनी १ लाख रुपयांची लाच मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने थेट अँटी करप्शन ब्युरो गडचिरोली येथे तक्रार दाखल केली.

त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या दरम्यान आरोपीने पुन्हा एकदा लाचेची स्पष्ट मागणी केली. ६ ऑगस्ट रोजी तडजोडीनंतर ठरलेली ७०,००० रुपयांची रक्कम स्वीकारतानाच ACBच्या पथकाने कारवाई करत दिनकोंडावार यांना रंगेहात पकडले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याप्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकप्रसंगी ACB पथकाने आरोपीच्या निवासस्थानी झडतीही घेतली आहे. पुढील चौकशी सुरू असून अन्य संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.

गोपनीय कारवाईत ACBचा यशस्वी सापळा…

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर पी. ढोले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि त्यांच्या पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने केली. पथकात सफौ सुनील पेददीवार, पोहवा राजेश पदमगिरीवार, किशोर जौजांरकर, स्वप्नील बांबोळे, संदीप उडान, संदीप घोरमोडे, प्रविण जुमनाके, हितेश जेटटीवार, विद्या मशाखेत्री, जोत्सना वसाके, राजेश्वर कुमरे व चा.पो.शी. चापले यांचा समावेश होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.