Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भात व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला अंतिम मुदतवाढ…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : शासकीय खरेदी केंद्रावर भात (धान) व भरडधान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांना शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२४ होती.

मात्र, अनेक शेतकरी विविध कारणांमुळे नोंदणी करू शकले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळावा, यासाठी विविध लोकप्रतिनिधींनी नोंदणी मुदतवाढीची मागणी केली होती.
अर्थ व नियोजन राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आणि आमदार राजू कारेमोरे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीची मुदत १५ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शेतकऱ्यांना हमीभावा पेक्षा कमी दराने विक्री करावी लागू नये, यासाठी महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून भात (धान) व भरडधान्य खरेदी प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.

राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग यांनी संबंधित एजन्सींना याबाबत सूचना दिल्या आहेत. ही मुदतवाढ अंतिम असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून शेतकऱ्यांनी १५ जानेवारी २०२५ च्या आत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे ही वाचा, 

गडचिरोली पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमीत्त करण्यात आले पथसंचलन

नववर्षाचा आनंद द्विगुणित : १५ परिवारात आले तान्हुले पाहुणे !

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा

 

Comments are closed.