Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्व. महेंद्र अधिकारी यांचे सामाजिक कार्य यापुढेही अविरत राहणार सुरू

जनसेवक महेंद्रजी अधिकारी मेमोरियल ट्रस्टची स्थापना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पालघर, दि. २८ जून : पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील सहकार, समाजसेवा, क्रीडा, शिक्षण आणि राजकारणातील एक नामांकित आणि उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे उद्योजक स्व. महेंद्र रत्नाकर अधिकारी. महेंद्र अधिकारी यांचे दि. 29 एप्रिल रोजी उपचारादरम्यान मुंबई येथे निधन झाले.

आज स्व. महेंद्र अधिकारी यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे मित्रपरिवार, कुटुंबीय, आप्तेष्ट व हितचिंतक यांनी कै. अधिकारी यांचे निस्वार्थ, प्रामाणिक कार्य अखंडित रहावे म्हणून जनसेवक महेंद्रजी अधिकारी मेमोरियल ट्रस्ट ची स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून गरजवंताना मानवतेच्या दृषटिकोनातून मदत करण्याचा उद्देश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज या ट्रस्टच्या माध्यमातून स्व. महेंद्र अधिकारी चेअरमन असलेल्या काटाळे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील व नागझरी शेतकरी बांधवांना एकूण ४०० केशर जातीच्या आंब्याची रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच यापुढे गरजूवंताना ट्रस्टच्या माध्यमातून मदत होईल.

“जनसेवक महेंद्रजी अधिकारी मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून महेंद्र अधिकारी यांची कार्यरुपी ज्योत अखंड तेवत ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल” असे स्व. महेंद्र अधिकारी यांचे बंधू रुपेश अधिकारी यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

भल्या पहाटेच ‘इथल्या’ मार्केटला लागली भीषण आग, एवढ्या दुकानाची झाली राखरांगोळी

…या महिन्यात सुरु होऊ शकतात महाविद्यालये – उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी पहिलीत दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांचे घरोघरी जाऊन केले स्वागत

 

Comments are closed.