Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुनर्वसनाच्या मागणीसाठी व्यापारी मंडळाच्या धरणे आंदोलनाला प्रारंभ; भामरागड येथील संपूर्ण व्यापार पेठ १०० टक्के बंद

बहुप्रतिक्षित पर्लकोटा नदीवर सुरू आहे पुलाचे बांधकाम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

भामरागड दि. २८ जून : तालुक्यातील पर्लकोटा नदीवर गत आठ महिन्यांपासून पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. सदर पुल भामरागड येथिल मुख्य बाजारपेठेतून जाणार आहे.

त्यामुळे अनेकांचे राहते घर व व्यावसायिकांचे दुकाने पाडल्या जाणार आहेत. येथिल व्यापाऱ्यांनी आठ महिन्यांपासून शासन – प्रशासनाकडे नविन बाजारपेठेसाठी हक्काची जागा मिळावी म्हणून अनेक निवेदन दिले, मात्र शासन-प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आज (दि. २८ जून) पासून मागणी मान्य होईपर्यंत त्रिवेणी व्यापारी संघटनेतर्फे धरणे आंदोलन व संपूर्ण व्यापार पेठ बंद करित आंदोलनाला सुरुवात केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सर्वप्रथम भामरागडच्या मुख्य चौकालगत सर्व व्यावसायिक एकत्र आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना आदिवासी सेवक सब्बरबेग मोगल यांचे हस्ते पुष्पहार घालून घोषणा देत आंदोलनाला सुरुवात केली.

यावेळी त्रिवेणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष बडगे, उपाध्यक्ष रमेश मारगोनवार, सचिव सलीम शेख, कोषाध्यक्ष राजेंद्र कोठारे, सहसचिव आसिफभाई सुफी, सदस्य संदीप मोगरे, मनोज मंडल, अरुण बोस, बबलू शेख, प्रदीप कर्मकार, सुरेश कोडापे, शकील शेख, सुजीत डे, संतोष मद्देर्लावार, बहादुर आत्राम इत्यादीसह संपूर्ण व्यापारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

हत्तीरोगापासून बचावाकरीता औषधाचे पूर्ण डोज घ्यावे – जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक

…या महिन्यात सुरु होऊ शकतात महाविद्यालये – उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

शेतकरी महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे घेऊन प्रगत शेती करावी – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन

 

Comments are closed.