Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरपर्यंत कायदेविषयक जनजागृती अभियान

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 05 नोव्हेंबर :-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्लीचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे मा. न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडून दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२२ ते दिनांक १३ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत कायदेविषयक जनजागृती व जनसंपर्काद्वारे नागरिकांचे सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे. त्याद्वारे अतिदुर्गम, मागासलेल्या व तळागाळातील लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी व शासनाच्या सर्व योजनांची माहिती नागरिकांना व्हावी याकरीता प्रयत्न केले जात आहेत. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या देखेरेखीखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांच्याकडुन संपुर्ण जिल्हयात, गावागावांत कायदेविषयक साक्षरता शिबीरांचे, विधी सेवा शिबीरांचे, आयोजन केले आहे. विधी स्वयंसेवकांमार्फत नागरिकांच्या घरोघरी जावून त्यांना कायदेविषयक माहितीपत्रके तसेच शासकीय योजनांसंदर्भातील पत्रके वाटप करण्यात येत आहेत.

नागरिकांच्या कायदेविषयक अडचणी समजुन घेवून त्यांना विधी सेवा पुरविली जात आहे. दिनांक ०९ नोव्हेंबर, २०२२ हा ‘राष्ट्रीय विधी सेवा दिवस’ असल्याचे औचित्य साधून गडचिरोली कारागृहात शिबीराचेआयोजन करण्यात आले आहे. कैदयांच्या मुदतपूर्व सुटकेकरीता, पॅरोल व फरलॉग करीता पात्र कैदयांची माहिती घेतली जाणार आहे व त्यांना त्या सेवा मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण झाली त्यानिमित्त कैदयांकरीता व बालगृहातील मुलांकरीता हक हमारा भी तो है@75 या अभियानाअंतर्गत न्यायाधिन बंदी व विधी संघर्षित बालक यांच्याकरीता मोहिम राबविली जात आहे. प्रत्येक कैदी व विधी संघर्षित बालक यांच्याशी विधी स्वयंसेवक व पॅनल वरील अधिवक्ता यांच्या मार्फत संपर्क साधून त्यांची माहिती घेतली जात आहे. त्यांना त्यांच्या खटल्याची सघ परिस्थितीची माहिती करून दिली जात आहे. त्यांना आवश्यक ती विधी सेवा पुरवली जात आहे. सदर अभियानाची सांगता दिनांक 13 नोव्हेंबर २०२२ रोजी महाशिबीराने होणार आहे. दिनांक १३ नोव्हेंबर, २०२२ रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाचे परिसरातील नियोजन भवनामध्ये विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली मार्फत शासनाच्या सर्व विभागांच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्टॉल्स उभारले जाणार आहेत. सदर कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमास जिल्हयातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, बचत गटाच्या महिला व इतर नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे सचिव श्री. आर. आर. पाटील यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.