Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अकोल्यातील आमदार प्रकाश भारसाकळेंना धमकीचे पत्र; ५ कोटी न दिल्यास मुलाला मारण्याची धमकी

Get real time updates directly on you device, subscribe now.

सभागृहात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला मुद्दा, कारवाईची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अकोला, दि. २ मार्च: अकोला जिल्ह्यातल्या अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे हे गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये अकोट विधानसभा मतदारसंघातून मोठ्या बहुमताने निवडून आले. तर यांच्या पत्नी भारसाकळे यासुद्धा अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर रुजू आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तर मुलगा हा जिनिंग प्रेसिंगचा कारभार सांभाळतो. परंतु अचानक 20 फेब्रुवारीच्या दरम्यान प्रकाश भारसाकळे यांच्या दर्यापूर येथील निवासस्थानी एका अज्ञात बिहारी नामक व्यक्तीने हिंदीमध्ये पत्र पाठवून पाच कोटी रुपये 28 फेब्रुवारीपर्यंत देण्यात यावी, अशी धमकी दिली. पैसे द्या अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारू, अशी धमकी त्या पत्रात देण्यात आली.

त्या पत्राच्या आधारे 21 फेब्रुवारी रोजी दर्यापूर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज संबंधित पत्राची माहिती पसरताच आता संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलेय. कारण आमदार प्रकाश भारसाकळे हे राजकीय क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यामुळे हे धमकीचे पत्र कोणी पाठवले असेल याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे. सदर घटनेच्या संदर्भात दर्यापूर पोलीस तपास करीत असून, धमकीच्या पत्राची दखल दर्यापूर पोलिसांनी घेतली आहे. अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना धमकीचे पत्र आल्याचा मुद्दा सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करून तातडीने चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली या प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीरपणे नोंद घेऊन कारवाई करू असं सभागृहात स्पष्ट केलं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.