Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्ह्यातील दारु बंदी उठवून मोहफुलावर आधारित दारू कारखाना सुरू करा – रामकृष्ण मडावी

गडचिरोली जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार रामकृष्ण मडावी यांची राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनातून मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जोगीसाखरा : गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलांचे उत्पादन भरपूर प्रमाणात होत असून त्यामानाने त्याला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे मोहफुलांचे खुली बाजारपेठ करण्यात यावी. तसेच जिल्ह्यालगतच असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याची दारु बंदी उठवली तशीच गडचिरोली जिल्ह्यातील दारु बंदी उठवून मोहफुलावर आधारीत दारूचा कारखाना उभारण्यात यावा आणि मिळणाऱ्या उत्पन्नातून जिल्ह्याच्या विकासात भर घालावी अशी आग्रही मागणी गडचिरोली जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार रामकृष्ण मडावी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी जाहीर केली पण ही दारूबंदी कागदोपत्री राहिली. जिल्ह्यात दारुबंदी असूनही ही दारूबंदी यशस्वी करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे विदारक चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाहेरचे काही समाज सेवेचे कोरडे ठेकेदार बसलेले आहेत आणि वारंवार दारु महाराष्ट्र व देशात सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यात बंद असावी म्हणून जे समाज सेवेचे बाहेरुन आलेले ठेकेदार आहेत यांचा जिल्हाशी कुठलाही समंध नाही तर या ठेकेदारामुळे जिल्ह्यातील दारु कागदोपत्रीच बंद आहे.

या ठेकेदारानी समाज सेवेच्या नावाखाली किती पैसे कृटुन कुठुन येतात याचाही आडिट व्हावा तसेच या जिल्ह्यात येऊन शासकीय जागा हडपलेल्या आहेत याची चौकशी होणे गरजेचे आहे असे फसवे असलेल्या दारुबंदीमुळे मिळणाऱ्या महसूलपासून वंचीत राहावे लागत आहे.दारूमुक्त जाहीर झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात प्रत्यक्ष मात्र दारुयुक्त असणारा जिल्हा आहे.दारूबंदी झाली ती फक्त कागदोपत्री, पण प्रत्यक्षात गडचिरोली पासून जिल्ह्यातील खेड्यापाड्यात सर्वत्र दारू मिळते. एकंदरीत यामुळे शासनाला मिळणार महसूल बुडत आहे.

त्यामुळे जिल्ह्यात दारू दुकाने पूर्ववत सुरू करा, जेणेकरून शासनास महसूल मिडेल व त्या महसुलामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी हातभार लागेल. जिल्ह्यातील दारूबंदी उठवून गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलाचा कारखाना सुरू केल्यास तो फायदेशीर ठरेल. मोहफुलाची खुली बाजारपेठ व कारखाना उभारल्यास या उद्योगविरहीत गडचिरोली जिल्ह्यात रोजगार प्राप्त होईल, वनसंपदेचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना होईल जिल्ह्यात दारूबंदी असुनही देशी, विदेशी, व गावठी मोहफुलांचे दारूविक्री सरासपणे सुरू आहे. दारुतून मिळणारा जिल्ह्यातील पैसे वापरून पश्चिम महाराष्टातिल द्राक्ष उत्पादक गलेलठ्ठ बनले आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक देणं असलेल्या वनसंपदेमध्ये मोहफुलांचा फार मोठा वाटा आहे. येथील मोहफुल अत्यन्त पौष्टिक स्वरूपाचे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात उद्योगाचे कोणत्याही प्रकारची साधने नसल्याने येथील युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील जनतेला त्यापासून वंचीत ठेवण्यासाठी समाजसेवेचे ठेकेदार कारणीभूत आहे तसेच दारु मुळे उदत्वत झालेल्या लोकांचे आता पर्यंत किती कृटुब सुधारले असते तर बेरोजगारी वाढली नसती. त्यामुळे जसी चंद्रपूर जिल्ह्यातील दारु बंदी उठवली त्याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला व बरोजगारांना न्याय देण्यासाठी दारूविक्री सुरू करून बुडणारा महसुल वाचवून जिल्ह्याच्या विकासासाठी तो खर्च करण्यात यावा.

बेरोजगारी दुर करण्यासाठी जिल्ह्यात मोहफुलाची बाजारपेठ उपलब्ध करून दारूचा कारखाना प्रशासनाने उभारून जिल्ह्याच्या विकासासाठी हातभार लावावा अशी मागणी गडचिरोली जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार रामकृष्ण मडावी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे निवेदनातून केली आहे केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

मोहफुल उत्पादनातून आदिवासींचे जीवनमान उंचावणार – आदिवासी विकास मंत्री ऍड. के.सी. पाडवी

Petrol-Diesel:-पेट्रोल शंभरी पार तर डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर

खुनाच्या गुन्ह्याखाली पोलीस निरीक्षकांसह 3 जणांना अटक; महाराष्ट्राचं पोलीस हादरलं

 

Comments are closed.