Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्ह्यात 6 ते 8 एप्रिल दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा व गारा पडण्याची शक्यता

6 व 8 एप्रिल रोजी येलो अलर्ट तर 7 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर, 6 एप्रिल :- भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात 6 ते 8 एप्रिल 2023 या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व जिल्ह्यात एक, दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा (वेग 40-50 किमी प्रति तास) आणि गारा पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून 6 व 8 एप्रिल 2023 या दिवसाकरीता येलो अलर्ट व 7 एप्रिल या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

याअनुषंगाने, नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी. पाऊस व गारपिटीचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी, जवस आदी पिकांची आवश्यक काळजी घ्यावी. वीजगर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीत मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीजगर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये. शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. जनावरांना मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे तसेच गोठ्यामध्येच चारा व पाण्याची उपलब्धता करून द्यावी.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे. शेतातील पिकांची, जनावरांची आवश्यक काळजी घ्यावी व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी केले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.